महाराष्ट्र 24 तास | केज – केज तालुक्यातील चंदनसावरगाव जवळ दोन कारचा भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
या बाबतची माहिती अशी की, ३१ मार्च रोजी रात्री १०:४५ वा. च्या सुमारास महामार्ग क्र. ५४८-डी केज-अंबेजोगाई रोडवर चंदनसावरगाव जवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपा जवळ (एम एच-२३/ई ६८५२) आणि (एम एच-१२/एम डब्ल्यू-३५६३) या दोन स्विफ्ट कारची समोरा समोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, आवाजाने वस्ती आणि गावातील नागरिक अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात दाखल झाले. या भीषण अपघातात तीघांचा मृत्यू झालेला असून एकजण गंभीर जखमी आहे. अमित दिलिपराव कोमटवार (वय ३४,रा. दिंद्रुड,ता. माजलगाव, बीड), परमेश्वर नवनाथ काळे (खांडी पारगाव,बीड) आणि अन्य एक जण अपघातात मृत्यू पावलेले असून एका जखमीची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना माहिती मिळताच त्यांच्या आदेशाने बीट अंमलदार शेंडगे, हेडकॉन्स्टेबल पठाण, हेडकॉन्स्टेबल वारे व वाहन चालक हनुमंत गायकवाड हे अपघात स्थळी पोहोचले. पोलीसांनी मृतदेह बाहेर काढून जखमीला सरकारी दवाखान्यात हलविले आहे.
