महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद (पालकत्व) स्वीकारल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना अजित पवार यांना त्यांच्या मुंबई येथील कार्यालयात भेटून त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी राजकिशोर मोदी यांच्यासमवेत कापूस पणन महासंघाचे संचालक ऍड विष्णुपंत सोळंके , अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी हे उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना अजित पवार यांच्या मुंबई येथील कार्यालयात त्यांची राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी बीड जिल्ह्याचे (पालकमंत्री पद ) पालकत्व स्वीकारल्याबद्दल ना. अजित पवार यांचे बीड जिल्हा तथा अंबाजोगाई वासीयांच्या वतीने अभिनंदन केले. या भेटीदरम्यान अजित पवार व राजकिशोर मोदी यांच्यात बीड जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्याचबरोबर अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी आवश्यक अशा सर्व विषयावर देखील चर्चा करण्यात आली.
राजकिशोर मोदी व ना. अजित पवार यांच्या भेटीदरम्यान अजित पवार यांनी राजकिशोर मोदी हे मागील अनेक वर्षापासून करत असलेल्या राजकिय, सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक तसेच बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाची ध्येयधोरणे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अजित पवार यांनी राजकिशोर मोदी यांना दिल्या. राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने ना. अजित पवार यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी आपण सदैव प्रयत्न करू असे अभिवचन राजकिशोर मोदी यांनी ना. अजित पवार यांना याप्रसंगी दिले.
