‘मूकनायक’ पुरस्काराचे २८ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात वितरण; राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार ‘आयबीएन’ लोकमतचे ब्युरो चिफ सिध्दार्थ गोदाम यांना जाहीर

अंबाजोगाई बीड
Spread the love

महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार ‘आयबीएन’ लोकमतचे ब्युरो चिफ सिध्दार्थ गोदाम यांना जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २८ जानेवारी मंगळवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय वृत्तपत्र सृष्टीत अगणित योगदान आहे. त्यांच्या प्रखर व तेजस्वी लेखणीने भारतीय लोकशाही अधिक मजबूत झाली. अशा महामानवाने ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र ३१ जानेवारी ‌१९२० रोजी उपेक्षित, शोषित, पिडीतांसाठी समर्पित केले. त्या निमित्ताने अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने ३१ जानेवारीला दरवर्षी ‘मूकनायक’ दिनाचे आयोजन करण्यात येते. यंदा हा कार्यक्रम २८ जानेवारीला पार पडणार आहे.

‘आयबीएन’ लोकमतचे ब्युरो चिफ सिध्दार्थ गोदाम हे गेल्या अनेक वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स माध्यमात कार्यरत असून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मिडियात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी तर प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे असणार आहेत. कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव होणार आहे. यात यमुना जनार्धन सोनवणे, सय्यद जहीरअली शाह कादरी, कल्याणी तपकिरे, ईश्वरी खाडे, आरती‌‌ कस्तुरे, अजय होळंबे, साक्षी‌ देशमुख, वंदना राहुल सुरवसे, अमित राजेसाहेब लोमटे यांचा‌ समावेश आहे.

‘मूकनायक’ दिनाचा हा कार्यक्रम ‌नगरपरिषदेच्या ‌स्व. विलासराव देशमुख सभागृहात २८ जानेवारी मंगळवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. तरी‌ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे, सचिव गणेश जाधव, संघाचे सन्माननीय सदस्य जगन (बापू) सरवदे, प्रा. प्रदिप तरकसे, परमेश्वर गित्ते, दादासाहेब कसबे, रोहिदास हातागळे, संभाजी मस्के, धनंजय जाधव, विश्वजीत गंडले, दत्ता वालेकर, प्रवीण कुरकूट, रवि आरसुडे, रतन मोती यांच्यासह आदी सदस्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *