खळबळजनक… अंबाजोगाईत दिवसाढवळ्या घरात घुसून नात्यातील व्यक्तिकडून गोळीबार, गोळीबार करून आरोपी फरार

अंबाजोगाई क्राईम बीड
Spread the love

महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अंबाजोगाई शहरातील माऊली नगरमध्ये असलेल्या पिंगळे रोहाऊस येथे दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

सिद्धेश्वर नवनाथ कदम (रा. पिंगळे रो हाऊस, अंबाजोगाई)  याच्यावर घराच्या खिडकीतून गोळी झाडून आरोपी फरार झाला आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले ,पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. आरोपीच्या शोधात पथक रवाना करण्यात आले आहे. दरम्यान हा प्रकार कोणत्या कारणावरून घडला याची माहिती गुन्हा दाखल झाल्यानंतर समजणार आहे. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला असून ज्याने गोळीबार केला त्याच्याकडे अधिकृत परवाना आहे का नाही हे समोर येणार आहे.

अंबाजोगाई शहरातील माऊली नगर मध्ये पिंगळे रो हाऊस मध्ये  सिद्धेश्वर नवनाथ कदम ( वय 24) हा आई व बहीण सोबत राहतात. त्यांच्या नात्यातील चुलत्याचा मेहुणा गणेश पंडित चव्हाण  (रा. रेणापूर, जिल्हा लातूर)  आज सकाळी 11.00 वाजता घरी आला पाठीवरील बॅग काढून बॅगेतील रिवाल्वर काढून खिडकीच्या काचेतून फायर केली. परंतु सिद्धेश्वर कदम याने आरोपी पाहताच दरवाजाच्या आडोश्याला लपला, त्यामुळे फायर केलेली गोळी सोप्याला लागली आणि सिद्धेश्वरचा जीव वाचला. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *