पुन्हा बीड जिल्हा हादरला…. वाहिरा गावात दोन सख्ख्या भावांची हत्या, तिसरा भाऊ जखमी

आष्टी क्राईम
Spread the love

महाराष्ट्र 24 तास | बीड – पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात ला हादरवून सोडणारी घटना घडली आहे.  यानिमित्ताने जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस क्राईमच्या घटना वाढताना दिसत आहेत. दहशतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आणखी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा गावातील दोन संख्या भावांची हत्या करण्यात आली आहे ही घटना गुरूवारी वाहिरा येथे रात्री दहाच्या दरम्यान घडली आहे.

तीन सख्खा भावांवर त्याच्याच समाजातील काही लोकानी लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली. अजय विलास भोसले,भरत विलास भोसले असे मयताचे नावे असून कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे. आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला. असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेतील सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का व कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजले नसून दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *