वाल्मीक कराडला १५ दिवसाची सीआयडी कोठडी ; केज न्यायालयात रात्री उशिरापर्यंत सुनावणी

केज क्राईम बीड
Spread the love

महाराष्ट्र 24तास | केज – राज्यामध्ये गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्याकांड आणि आवादा एनर्जी पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यातील आत्मसमर्पण केलेला वाल्मीक कराड याला के ज न्यायालयाने १५ दिवसांची सी आय डी कोठडी सूनावली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथे दि. ६ डिसेंबर रोजी आवादा एनर्जी या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयात खंडणी मागितल्या प्रकरणी झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेले सरपंच संतोष देशमुख यांचे सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी दिनांक ९ डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे खून केला. तसेच दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांनी फोन वरून दोन कोटी रू. ची लाच मागितली म्हणून आवादा एनर्जी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुनील केदू शिंदे यांनी ११ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादी वरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मीक कराड आणि राष्ट्रवादी.काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्यासह तिघांच्या विरुद्ध गु र नं. ६३८/२०२४ भा. न्या. सं. ३०८(२), ३०८(३), ३०८(४), ३०८(५) ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान.दिनांक ९, डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाल्या नंतर या हत्याकांडाशी खंडणी प्रकरण सबंधित असून त्या दिवसा.पासून वाल्मीक कराड फरार होता.
दरम्यान वाल्मीक कराड यांचे हा दि. ३१ डिसेंबर रोजी पुणे येथील सीआयडी कार्यालयात हजर होत आत्मसमर्पण केले.
त्या नंतर त्याला सी आय डी च्याच पथकाने रात्री १०:०० वाजता के ज पोलीस ठाण्यात आणून त्याला रात्री १०:४५ वा. क्या सुमारास केज येथील क स्तर कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पावस्कर यांनी त्याला दि. १४ जानेवारी २०२५ पर्यंत १५ दिवसांची सी आय डी कोठडी सुनावली आहे.

ठळक घडामोडी ,केज मध्ये मोठी गर्दी –

संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे एका बाजूला मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समर्थक दोन्हीही गटागटाणे पोलीस स्टेशन आणि न्यायालयाच्या परिसरात जमा झालेले होते.

नियमित सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऐवजी दुसऱ्या वकिलांनी मांडली सरकारची बाजू :- वाल्मीक कराड यांच्या खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी केज न्यायालयाचे नियमित सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. संतोष देशपांडे यांच्या ऐवजी ॲड. जे. बी. शिंदे यांनी बाजू मांडली.

पोलिसांचा कडक बंदोबस्त :- संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे आणि वाल्मीक कराड यांच्या हत्येमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावुन पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना व आर सी पी एफ च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *