महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – महामेनवा मॉनेस्ट्री श्रीलंका येथील भन्ते धम्मसुगत यांनी सोमवारी सायंकाळी संघर्षभूमीला भेट दिली. यावेळी प्रथम त्यांनी तथागत बुद्ध , डॉ बाबासाहेब आंबेडकर व विविध प्रेरणास्थळांना पुष्प अर्पण केले. उपस्थित सर्वांनी त्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
पंकज भटकर यांनी त्यांना संपुर्ण परिसराची व प्रेरणास्थळांची माहिती दिली. ॲड संदीप थोरात यांनी येथे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी भन्ते धम्मसुगत म्हणाले की या परिसराला भेट दिल्याचा मला आनंद वाटतो. स्वतःच्या स्वाभिमान निधीतून उभारलेले हे प्रेरणास्थळे प्रेरणादायी आहेत असे ते म्हणाले. याप्रसंगी ॲड शाम तांगडे , संजय हतागळे , डॉ किर्तीराज लोणारे , विश्वनाथ सावंत , नरसिंग कालेकर , बलभीम बनसोडे , बाबुभाऊ कांबळे , अनंत सरवदे , द्रुपदाआई सरवदे आदींची उपस्थिती होती.
