परळीत हवेत गोळीबार करणारा कैलास फडला पोलिसांनी केली अटक

क्राईम परळी बीड
Spread the love

महाराष्ट्र 24 तास | परळी – सोशल मिडीयावर रिव्हालवर मधून हवेत गोळीबार करणाऱ्या परळी येथील इसमाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सदर व्हीडीयो मधील व्यक्ती ही कैलास बाबासाहेब फड (रा. कन्हेरवाडी, ता. परळी, ह.मु. बैंक कॉलनी, परळी वै.) असल्याबी परळी शहर पोलीसांची खात्री झाल्यानंतर या प्रकरणात दोन दिवसापूर्वीच गुन्हा दाखल झाला होता, पोलिसांनी या प्रकरणी कैलास याला अटक केली आहे. त्याच्या जवळील रिवाल्वर देखील जप्त करण्यात काल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

परळी येथील आरोपी केलास बाबासाहेब फड याने त्याच्याकडील परवाना प्राप्त असलेल्या रिव्हॉल्वर मधून हवेत फायर केलेल्या घटनेबाबत माहिती देत सदरची घटना ही सुमारे एक वर्षांपूर्वीची असून त्याने त्याच्या घरासमोरील वाहनाची पुजा करतांना हवेत फायर केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. परंतु आरोपी कैलास बाबासाहेब फड याने जिल्हाधिकारी यांचे शस्त्र परवान्यातील अटी शर्तींचे उल्लंघन करून रिव्हॉल्वर मधून हवेत फायर केल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस शिपाई विष्णू फड यांच्या फिर्यादीवरून दोन दिवसापूर्वीच परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयातील आरोपी कैलास बाबासाहेब फड़ यास आज दि. 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठली सुनावली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधिक्षक नवनीत कावंत, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना लिङने, उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले, पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन याच्या मार्गदर्शनाखाली परळी शहर पोलीस स्टेशन स पो नि बाय बी. शिंदे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *