महाराष्ट्र 24 तास | परळी – मानवी मूल्यांना नाकारणारी मनुस्मृती महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळली आणि तत्कालीन समाजव्यवस्थे विरुद्ध बंड केले असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक भीमयुगकार रानबा गायकवाड यांनी केले.ते 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिनानिमित्त परळी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
फुले-आंबेडकरी अभ्यास समुह व सम्राट अशोक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने परळी येथील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास प्रथम पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मनुस्मृती हा ग्रंथ सुमती भार्गव यांनी लिहिला होता.तर त्याची अंमलबजावणी सम्राट अशोकाचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर पहिल्यांदा लागू करणारा राजा पुष्पमित्र शुंग हा होता.ही विषमता वादी मनुस्मृती जाळली पाहिजे असे महात्मा जोतिबा फुले यांचीही इच्छा होती.
यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून या देशातील भेदभाव व विषमता नष्ट केली आणि सर्वांना समान न्याय देणारी राज्यघटना देशाला दिली.परंतू आजही मनुवादी प्रवृती 9 ऑगस्ट 2018 रोजी जंतर मंतर येथे संविधान विरोधी जी कृती केली तसेच परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली यातून त्यांचा परिवर्तन चळवळीला आणि संविधानाला विरोध दिसून येतो.
याप्रसंगी वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रा.दासू वाघमारे, अंनिस चे बीड जिल्हा सदस्य प्रा . विलास रोडे,प्रशांत कदम यांनीही आपले विचार मांडले.या कार्यक्रमास औष्णिक विद्युत केंद्राचे उप कार्यकारी अभियंता श्रीकांत इंगळे,सोपान निलावाड सर, हनुमंत वाघमारे सर, रमेश मोरे, संपादक नितीन ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाने, वसंत बनसोडे, अशोक वाघमारे, मिलिंद बनसोडे, एल डी घोबाळे,महेश मुंडे, आकाश देवरे, विशाल डोंबे, महिंद्र वाघमारे,अमोल डोंबे आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन फुले- आंबेडकर अभ्यासक भगवान साकसमुद्रे यांनी केले.
