शरदचंद्र पवार यांनी मस्साजोग येथे घेतली पीडित कुटुंबाची, गावकऱ्यांनी केली मागण
महाराष्ट्र 24 तास | बीड – जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेला आज १३ दिवस झाले आहेत. आजपर्यंत यातील चौघे आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज शरदचंद्र पवार यांनी पीडित देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी कुटुंबाकडून प्रकरण जाणून घेतले आहे. यावेळी गावकऱ्यांनी सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, कोपर्डी सारखं खटला लवकर निकाली काढावा, कुटुंबातील शासकीय नौकारीत घ्यावे, मुलांना शिक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्या, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची गावकऱ्यांची मागणी केली आहे. यावेळी खा. निलेश लंके, राजेश टोपे, खा. बजरंग सोनवणे, आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
या घटनेने सर्वाना धक्का बसला, या जिल्ह्यात वारकरी संप्रदाय आहे. ही घुटना कुणालाही न पटणारी घटना आहे, जी घटना घडली यात सरपंच देशमुख यांचा काहीही संबंध नव्हता, या घटनेची नोंद राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी, बजरंग सोनवणे यांनी आणि सर्वांनी हा प्रश्न लोकसभेत मांडला, या देशाच्या राज्यात काय चाललंय , या घटनेचा खोलात गेले पाहिजे, मुख्यमंत्री यांनी कुटुंबाला मदत केली, प्रकरणाच्या खोलात जाऊन मुख्य सूत्रधार शोधून काढला पाहिजे. बीड जिल्ह्यात दहशतिचे वातावरण आहे, या कुटूंबाला न्याय दिला पाहिजे. मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली असं पवार म्हणाले.
