महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – परभणी येथील पोलीसी अत्याचाऱ्याच्या विरोधात धार्मिक व जातीय अत्याचार विरोधी प्रतिकार समिती, अंबाजोगाईच्या जेलभरो आंदोलन करण्यात आले.यावेळी पोलिसांनी शेकडो महिला पुरुष आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
परभणी येथील पोलीसी अत्याचाऱ्याच्या व सभागृहात अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य विरोधात उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर धार्मिक व जातीय अत्याचार विरोधी प्रतिकार समिती, अंबाजोगाईच्या वतीने तिव्र निदर्शने केले.
या निवेदनातील मागणी
सनातनी कॉर्परेट सत्ता भारतात आणि महाराष्ट्र राज्यात आल्या पासून दलित अनिवासी आणि अल्पसंख्याक यांना लक्ष करून पोलीसा मार्फत याची दडपशाही केली जातेय, कधी जनातिर वर संविधान जाळले जाते तर कधी डॉ. बाबासाहेबाची प्रतिमाची विटंबना केली जाते. याचा प्रतिकार करणाऱ्या दलिताच्या जनतेला मरेपर्यंत मारझोड करणे त्याचे वस्तीत रात्री आपरात्री पोलीस कोम्बींग ऑपरेशन करतांना बाळांतीनण तरुणी शिकत असलेल्या मुली तरुण आणि वृध्द सर्वावर बेछुट असा लाठी हल्ला, पोलीसाकडून होतो. परभणीत अशाच अमानुष हत्यात सर्व वस्त्यातील सर्व वयोगटातील स्त्री, पुरुषांना लक्ष करुन अमानुष अशी मारङ रोड केली, महिलांची, तरुणांची हाडे मोडली, बाळांतीण तरुणींना सोडले नाही, रस्त्यातील वाहने दुचाकी, तीनचाकी, चार चाकी यावर डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमा असतांनाही तोडफोड केली. सुर्यवंशी या तरुणास जी मारहान झाली ती त्याचा जिव घेण्यासाठीच झालेली होती व त्यातच त्याचा जिव घेतला गेला. तीन वर्षापुर्वी घाटनांदुर या आपल्या हद्दीतील गावातः पोलीसावर प्रचंड हल्ला झाला होता, मुस्लीम पोलीस जमादार गंभिर जखमी झाला पण पोलीसांनी आरोपींना पकडण्यासाठी कोठेही कोम्बींग ऑपणन केले नाही. तात्पर्य, दलित आदीवासी व अल्पसंख्याकांना किडामुंगी सारखे रगडण्याची सत्ताधारी यांची जातीय मानसिकता आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया समोरील घटना शिल्पाची मोडतोड होते, हा काही योगायोग नाही तर वैचारीक शत्रुच्या छावणीत आंबेडकरी विचार त्यांची प्रतिके याविरुध्द कायम षडयंत्र चालु आहे.
तडीपार अमितशाह यानेही संसदेत डॉ. बाबासाहेबांच्या बद्दल गरळ ओकून भाजपा व संघाचा खरा चेहरा दाखविला आहे. एकेकाळी न्यायर्यालयाचा गुन्हेगार असलेला माणूस इतका सफाईदारपणे या देशात भेदभाव आणि धार्मिक ध्रुविकरण या आधारे संविधानाचा आधार घेवून उच्च अशा संविधानिक राजकीय पदावर गेला व देशाच्या सामाजिक न्याय, स्त्री स्वातंत्र, दलित आदिवासी आणि तमाम जाती धार्मातील माणूसकी नाकारलेल्या समाजाचे जे मानबिंदु आहेत त्यांच्या बद्दल लोकसभेत गरळ ओकतो त्या अमित शाहचा आम्ही तिव्र धिक्कार करतो या सर्व परिस्थितीत परभणीत जी अमानुषता घडविली गेली त्या विरोधात आम्ही निषेध म्हणून स्वतःच जेल भरो करीत आहोत.
धार्मिक व जातीय अत्याचार विरोधी प्रतिकार समिती, अंबाजोगाईच्या वतीने या जेलभरो आंदोलनात
कॉ. बब्रुवाहन पोटभर, महादेव आदमाने,कल्याण भिसे,हमीद चौधरी,सुधाकर देशमुख,
अशोक पालके, धीम्मंत राष्ट्रपाल,
राजेश वाहुळे,अक्षये भुंबे,भिमराव सरवदे,विनोद शिंदे,अजय सरवदे,
सुशिल गायकवाड, सचिन गालफाडे,
राम वाघमारे,जिवन घाडगे,
अशोक काळे,
मुन्ना वेडे, बादल तरकसे, विशाल शेवाळे,
भैय्यासाहेब सोनकांबळे,
बाबा शेख, विश्वजित शिंदे
आनंद मोरे,प्रितम वाघमारे,मंजुषा दादासाहेब कसबे,विद्दा आत्माराम गावडे,छाया गौतम कसबे,वैशाली मस्के,सुमन बालासाहेब कसबे,लोंढताई यांच्यासह ईतरांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले.
