मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचा पीएम रिपोर्ट समोर…पीएम रिपोर्ट मध्ये संतोष देशमुख यांच्या अंगावरती 56 जखमा

क्राईम बीड
Spread the love

महाराष्ट्र 24 तास | बीड – बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. दररोज या प्रकरणी नव नवीन खुलासे होत आहे. अशातच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल हा सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशमुख यांच्या मृत्यूचं कारणही समोर आलं आहे. तसंच देशमुख यांचे डोळे लायटरने फोडण्यात आले की नाही याबद्दल डॉक्टरांनी दुजोरा दिला नाही.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आला आहे. संतोष देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल सीआयडीकडे जमा करण्यात आला आहे.

संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. दुखापत झाल्यामुळे अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाला, शॉकमध्ये गेल्याने मृत्यू देशमुख यांचा मृत्यू झाला होता. एकूण ८ पाणाचा हा अहवाल आहे. सर्व अवयव छाती, हात, पाय, चेहरा, डोके याला जबर मार लागला आहे. देशमुख यांच्या चेहऱ्यावर मार लागला आहे. डोळे काळे निळे झाले आहे. मात्र डोळे जाळण्याच्या प्रकाराला राज्यजिल्हाशल्य आणि आरोग्य विभाने दुजोरा दिला नाही. एकूण ३ डॉक्टरांच्या टीमने देशमुख यांचं शवविच्छेदन केलं आहे.

संतोष देशमुखांना अतिशय अमानुषपणे मारहाण

दरम्यान, मारहाण करणाऱ्या तरुणांनी संतोष देशमुखांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली. संतोष यांच्या अंगावर एक इंच जागा शिल्लक नाही. शरीरावर सगळीकडे मारहाणीचे वळ उमटले आहेत. फायटरने मारहाण केली, लायटरने डोळ्याला चटके दिले असल्याचं सांगितलं जात आहे.

४ आरोपींना अटक

मस्साजोग प्रकरणात आधी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी चार आरोपी फरार आहे. याच प्रकरणात आज आरोपी विष्णू चाटे याला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 4 वर गेली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी आहे. या प्रकरणात विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता. मात्र पक्षातून त्याचे निलंबन करण्यात आले. तसंच वाल्मिक कराड याच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.संतोष देशमुख हे केजहून मस्साजोगकडे निघाले होते. रस्त्यात टोल नाक्याजवळ एक काळया रंगाची स्कार्पिओ त्यांच्या कारचा पाठलाग करत होती. टोलनाका परिसरातच त्यांच्यावर हल्ला झाला त्यानंतर त्यांचा अपहरण करण्यात आलं. अमानुष मारहाणीत त्यांचा अखेर मृत्यू झाला. मृत्यू होण्यापूर्वी त्यांच्या कारचा पाठलाग करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडीओत सुरुवातीला एक पांढऱ्या रंगाची कार जाताना पाहायला मिळते. त्यानंतर लगेचच दहा सेकंदात दुसरी काळया रंगाची स्कार्पिओ गाडी त्यांचा पाठलाग करताना या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. हा सर्व खेळ अवघ्या चार मिनिटात झाला. अपहरण करून भरधाव वेगाने पुन्हा काळा रंगाची स्कार्पिओ केजच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *