महाराष्ट्र 24 तास | बीड – राज्यात मस्साजोग येथील प्रकरण गाजत असतानाच आता मुंडे बहीण भावाच्या जिल्ह्यात हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने महिलेवर बलात्कार करुन वारंवार बळजबरी करुन जीवे मारण्याची धमकी देणाची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने स्वतःची आपबीती सांगताना टाहो फोडला आहे. दरम्यान याप्रकरणी नराधमाविरोधात युसुफ वडगाव पोलीसांत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे.
या संदर्भात अंबाजोगाई तालुक्यातील अत्याचारीत महिलेने युसुफ वडगाव पोलीस स्टेशन ला हजर होवून दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मला पती व एक मुलगा असे असुन आम्ही मजुरी करुन उपविवीका भागवतोत. माझा मुलगा उसाचे ट्रॅक्टर चालक म्हणुन बाहेरगावी कारखान्यावर गेला आहे. माझे पती आमचे गावातील शेतात सालगडी म्हणून काम करतात व मी देखील रोज त्यांचेच शेतात रोजंदारीने काम करते. कामासाठी ये जा करणेकरीता गैरसोय होत असल्याने शेत मालक यांनी त्यांचे शेतातील एक पत्र्याची खोली मला व माझे पती यांना तेथेच करून खाण्यासाठी व राहण्यासाठी दिली होती. त्यामुळे आम्ही तेथेच राहत होतोत. आमचे गावात राहणारा व ओळखीचा नवनाथ दगडु मोरे याचे पण शेत शेतमालकाचे शेता जवळच असल्याने तो तेथून येत जात होता. तो येता जाता मला काहीतरी कारण काढुन बोलण्याचा प्रयत्न करत असे. मला पाहुन तो नेहमीच वेगळ्याच नजरेने पाहत असे त्याबाबत मी टाळाटाळ करत होते.
दि. २२ ऑगस्ट २४ रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता माझे पती किराणा सामान आणण्यासाठी लोखंडी सावरगाव येथे गेले होते. खोलीवर मी एकटीच होते त्यावेळी अर्ध्या तासांनी सात वाजण्याचे सुमारास नवनाथ दगडु मोरे हा तेथे आला व माऊली घरी आहेत का असे विचारले असता मी त्याला म्हणाले की मोरे काका आमचे घरी कोणी नाही तुम्ही येथुन निघुन जा मला तुमचे काही एक ऐकायचे नाही. असे म्हणताच त्याने मला दंडाला धरून खाली पाडले. मी जोरात ओरडले असता त्याने मला हाताला धरुन फरफटत ओढत मी राहत असलेल्या रुममध्ये नेले व माझी साडी वर करून बळजबरी माझे सोबत शारिरीक संबंध केले व मला जाताना म्हणाला की तु माझ्या मनासारखी वागलीस तर तुला पाहिजे ते देतो पण तु जर कोणाला सांगशील तर तुला बघुन घेतो व जिवे मारून टाकीन अशी धमकी देवून पंधरा मिनिटांनी निघुन गेला. मी घाबरुन व इज्जत जाईल म्हणुन ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. त्याच्या भितीने मी पुन्हा आमचे गावी लक्ष्मीचे सणाचे निमित्ताने गावातील घरी राहायला गेले. परंतु तो पुन्हा पुन्हा कामाच्या ठिकाणी माझेवर पाळत ठेवुन माझेकडे येवुन मला बोलण्याचा व संधी साधण्याचा प्रयत्न करत होता. परंतु मी त्याकडे दुर्लक्ष करीत गेले. त्यानंतर दि. २५ नोव्हेंबर २४ रोजी सकाळी सात वाजता मी चनई शिवारात माझे पुतणीचे जनावराचे शेडकडे माझे पती घरी कसे आले नाहीत म्हणुन त्यांना बघण्यासाठी रोडने जात असताना डि पी जवळ नवनाथ दगडु मोरे याने माझे पाठीमागुन मोटार सायकल घेवुन आला व मला एकटीला पाहून मला म्हणाला की तु मला का टाळतेस असे म्हणुन शिवीगाळ करत मला बाजुच्या शेतात ओढले व तेथे माझी छाती दाबुन साडी फेडुन माझेशी संबंध करण्याचा प्रयत्न केला. तेथून मी कशीबशी सोडवणुक करून पळाले व आता बस झाले तुझे मी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी चालले म्हणुन मी तेथून निघुन घराकडे आले. परंतु माझे पती काही घराकडे आले नाहीत त्यामुळे मी एकटीच अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला गेले. व तेथील पोलीसांना माझे सोबत घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता त्यांना मी पूर्वी पासुन घडलेली घट्ना सांगितली सदर घट्ना ही पोस्टे युसुफवडगावचे हादीत असल्याने मी त्यानंतर घरी जावुन माझे सोबत घडलेला सर्व प्रकार माझे पती यांना सांगितला व आम्ही दोघे पोस्टे युसुफवडगांव येथे येवुन तक्रार दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून यूसुफवडगाव पोलिसांनी गु.र.नं. २७१/२०२४ अन्वये सदरील आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ अन्वये कलम ३३३, ७४,७५, ७६, ७८, ६४, ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.
