महाराष्ट्र24तास | अंबाजोगाई – विविध प्रकारच्या स्पर्धांचे पुरस्कार वितरण आणि संमेलन सजवणाऱ्या हातांचा सत्कार या सह आगामी वर्षातील संकल्पाने 11व्या अंबाजोगाई साहित्य सम्मेलनाची सांगता मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये झाली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ आदित्य पतकरावं, सुदर्शन रापतवार (स्वागताध्यक्ष), दगडू लोमटे (अध्यक्ष, मसाप), अमर हबीब तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सम्मेलन अध्यक्ष बालाजी सुतार हे होते.
या प्रसंगी बोलताना डॉ आदित्य पतकरावं म्हणाले की, सौभाग्य काय असतं ते मला आज या माझ्या मायभूमी मधील व्यासपीठावर कळलं. आपण मेहनत केली तर निश्चितच यश मिळते हे मी माझ्या जीवनातील संघर्षा वरून कळलं. शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीवर विद्यार्थी घडत असतो. अमर काका यांच्या संकल्प पूर्ती साठी या वेळी 10 हजार रु ची मदत दिली.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी बालाजी सुतार म्हणाले की, आपण लोका पासून तुटतो आहोत का? हा या निमित्याने पडलेला प्रश्न असून या मध्ये सर्वाना सोबत घेऊन साहित्याची वाटचाल व्हावी. कशाचीही तमा न बाळगता काही साहित्यिकाने आपल्या भूमिका मांडल्या आहेत हा इतिहास आहे.
कविता लिहणे ही अत्यन्त गंभीर कृती असते.
या प्रसंगी मार्गदर्शक अमर हबीब यांनी फेब्रुवारी मध्ये मराठी भाषा दिवसा निमित्य मुकुंदराज परिसरात कवी सम्मेलन, भावठाणा येथे अनिकेत लोहिया लोहिया स्वागताध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कवी संमेलन, दिवंगत साहित्यिकांचा दस्तऐवजिकरण करणे यामुळे त्यांची आठवण राहील. आदी संकल्प जाहीर केले.
या वेळी स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांचा मसाप अंबाजोगाईच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना सुदर्शन रापतवार म्हणाले की, सम्मेलन यशस्वी करण्यासाठी म सा प च्या पदाधिकाऱ्यांनी मला सहकार्य केले. सम्मेलन यशस्वीते साठी नवीन उपक्रम राबवण्यात आले. सर्व उपक्रम व परिसवादाला चांगला प्रतिसाद मिळाला. या निमित्य समाज माध्यमावरील मुके पणा बद्दल मला चिंता वाटते आहे. एक सजग पत्रकार म्हणून मला हे अस्वस्थ करणारे आहे.
या वेळी साहित्य सम्मेलना निमित्य विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी संमेलन सजवणाऱ्या हातांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन तिलोत्तमा पतकराव, प्रा. डॉ. सागर कुलकर्णी,
आभार प्रदर्शन – गोरख शेंद्रे (सचिव) यांनी तर संयोजन अनिकेत डिघोळकर, शरद लंगे यांनी केले.
