महाराष्ट्र24तास | अंबाजोगाई – लोखंडी सावरगाव जवळ चार वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात दि.१५ डिसेंबर रोजी रात्री ८.०० वाजताच्या दरम्यान झाला असून या अपघातात एक कार ,ट्रॅक्टर चे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कसल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये लातूर बीड महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. गेल्या आठ दिवसांत या महामार्गावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा बळी गेला आहे. मांजरसुंबा ते बर्दापूर पर्यंत दोन पदरी रस्ता असल्यामुळे नेहमीच या रस्त्यावर अपघात होत आहेत. वेळोवेळी चार पदरी रस्ता करण्याची मागणी अनेक वेळा या भागातील नागरिकांनी केली असून अद्यापहीही मागणी पूर्ण झाली नसल्यामुळे अपघात होत आहेत. तात्काळ हा रस्ता चौपदरीकरण करण्यात यावा अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
