महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – लातूर – अंबाजोगाई महामार्गावरील अंबासाखर कारखाना जवळ स्विफ्ट कार आणि ट्रकचा भिषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी ७.०० वाजताच्या दरम्यान घडली आहे. या भीषण अपघातात स्विफ्ट कार मधील दोघांचा जाग्यावर मृत्यू झाला आहे तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनी मदत करत जखमींना रुग्णवाहिकेने तात्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान अपघातातील जखमींची नावे अद्याप मिळू शकलेली नाहीत. या अपघातात स्विफ्ट कार क्रमांक एम एच १४, एल एल ६७४९ कार चा चुराडा झाला आहे.
