महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर विद्यार्थ्यांवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. सध्या ऊसतोड कामगार हे ऊसतोडणीसाठी बाहेर राज्यात तसेच जिल्ह्यात गेले असल्याने त्यांच्या मुलांचा शिक्षण बंद पडू नये यासाठी शासनाने हंगामी वसतिगृहाची सोय केलेली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील येल्ड। येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील हंगामी वसतिगृहात नेहमी प्रमाणे जेवण देण्यात आले. यात वांग्याची भाजी, भात आणि भाकरी जेवण्यासाठी बनवण्यात आली. दि.8 डिसेंबर रोजी रात्री 8.00 वाजता विद्यार्थ्यांनी जेवण देण्यात आले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना रात्री 12.00 वाजता मळमळ सुरू झाली. त्यानंतर सुरुवातीला 6 विद्यार्थ्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हळूहळू विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाला आणि हीच विद्यार्थी संख्या 15 वर पोहचली आहे. येल्ड। येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. गावातील संस्था आणि वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना याच वसतिगृहात जेवण देण्यात येते. 1 ली ते 7 वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील ऊसतोडणीसाठी बाहेर गेले आहेत अश्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहात जेवणाची सोय करण्यात आली आहे.
