महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – मागील काही दिवसापासून अंबाजोगाई तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यात माकेगाव येथे दि.28 नोव्हेंबर रोजी एका शेतकऱ्याचा बैलाचा फडशा पाडला होता. कुंबेफळ शिवारात अर्धवट हरीण खाल्ल्याने हे हरीण नेमकं कुणी खाल्ले याची शंका नागरिकांमध्ये होती याबाबत वन विभागाच्या अधिकारी विजया शिंगटे यांच्याकडून माहिती घेतली असता हे हरीण बिबट्याने नाही तर मोकाट कुत्र्याने खाल्ल्याची माहिती देण्यात आली असून पेट्रोल पंपावरील व्हिडिओ हा बिबट्याचा नसून तो कुत्र्याचा असल्याचा सांगण्यात आले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथे बिबट्याने बैल खाल्ल्याच्या नंतर वन विभागाकडून बिबट्या ला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता मात्र बिबट्या काही सापडला नाही. त्यानंतर परिसरातील कुंबेफळ, कानडीसह अनेक गावात शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतात जायला शेतकरी मजूर भीत आहेत. वन विभागाने गावागावात जाऊन शेतकरी, नागरिकांना मार्गदर्शन करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
बिबट्याला 24 तासाला एक शिकार लागते अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथील बैलाची शिकार केल्यानंतर अंबाजोगाई तालुक्यात एकही घटना घडली नसल्याने बिबट्या जंगलाच्या दिशेने जाऊ शकतो. परिसरात सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात असल्याने कोणीही अश्या अफवा पसरवू नये खबरदारी घ्यावी असे आवाहन वन विभागाच्या अधिकारी विजया शिंगटे यांनी केले आहे.
