महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – अंबाजोगाई परिसरातील मुकूंदराज परिसरात गेल्या दहा वर्षापुर्वी बिबट्याचा वावर होता अशी शेतकर्यांची समज होती. परंतु वनविभागाने त्याला पिंजर्यात जेरबंद करण्यात त्यांना यश आले होते. दहा वर्षानंतर तालुक्यामध्ये बिबट्या दिसल्याची चर्चा नव्हती परंतु बुधवार रात्री जवळगाव, पुस शिवारात बिबट्या ऊसाच्या फडातुन बाहेर निघाल्याचे अनेक शेतकर्यांनी पाहिले. त्यामुळे या गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर तेलघणा परिसरात बिबट्याच्या पावलाची ठसे हरभर्याच्या पिकात उमटल्याचे दिसून आले त्यानंतर काल सायंकाळी ममदापूर परिसरात एका शेतकऱ्याला रस्ता क्रॉस करताना बिबटया दिसला त्यानंतर काही जुने व्हिडिओ देखील वायरल झाले,आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी शेतात जायला तयार नाहीत. घटनेची माहिती मिळताच वनपाल विजया शिंगटे यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेत भेट दिली आहे. शेतकर्यांनी शेतात कामे करताना स्वरक्षणासाठी साहित्य वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अंबाजोगाई तालुक्यात बालाघाटच्या डोंगरदर्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वन्य प्राणांचा वावर असतो. हे दहा वर्षापुर्वी बुट्टेनाथ परिसरात जनावरांचा फडशा पाडणारा बिबट्या वनविभागाने जेरबंद केला होता. परंतु नंतर येल्डा परिसरात वनविभागाने जाळे लावून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या तावडीतून देखील तो सुटला आणि तेलघणा परिसरात वनविभागाने त्याला जेरबंद करण्यात यश मिळविले. या घटनेला दहा वर्षाचा काळ लोटल्यानंतर पुन्हा एकदा अंबाजोगाई तालुक्यात बिबट्या सक्रिय झाल्याचे शेतकर्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी वनविभागाला दुरध्वनीवरून संपर्क साधून बिबट्याच्या वावराची कल्पना दिली. त्यानूसार अंबाजोगाईचे वनपाल अधिकारी विजया शेंगटे यांनी त्यांच्या पथकासह पुस व जवळगाव परिसरात जावून त्या भागाची पाहणी केली. तसेच तेथील शेतकर्यांना भितीचे कारण नाही असे सांगुन बिबट्या दिसताच वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी दोन्ही गावातील शेतकर्यांशी केला.
अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर शिवारातील रवी देशमुख यांचा बैलाचा रात्री 8.00 वाजता फडश्या पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान।बैलाचा फडश्या हा नेमका कुठल्या प्राण्याने केला हा शवविच्छेदन केल्यानंतर समजणार आहे. वनविभागाच्या वनपाल विजया शिंगटे यांनी पिंजरा घेऊन पथकासह घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत.
शेतकर्यांनी शेतात कामे करताना स्वरक्षणासाठी साहित्य वापरावे
अंबाजोगाई तालुक्यातील पुस व जवळगाव आणि ममदापूर शिवारात बिबट्याच्या पावलाचे ठसे उमटल्याचे निदर्शनास आले आहे. या भागात बिबट्या असल्याची दाट शक्यता आहे. शेतकर्यांनी स्वरक्षणासाठी शेतात जाताना कुर्हाड, विळा, गोफन, कोयता, काट्या या वस्तुंचा वापर करावा. तसेच बिबट्या दिसताच वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन वनपाल अधिकारी विजया शिंगोटे यांनी केले आहे.
